तेजस्वी, राबडींना जामीन मंजुर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/rabri-devi-.jpg)
नवी दिल्ली – रेल्वेच्या आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या न्यायालयाने जामीन मंजुर केला. याच प्रकरणात लालूप्रसाद यादव यांनी कोर्टापुढे हजर राहण्याचे समन्सही आज न्यायालयाने जारी केले.
राबडीदेवी व तेजस्वी यादव यांना मंजुर केलेले जामीन प्रत्येकी एक लाख रूपयांचे असून तेवढ्याच रकमेचे जामीनदारही त्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
लालू प्रसाद हेही या प्रकरणातील आरोपी आहेत. आजच्या सुनावणीच्यावेळी त्यांनीही कोर्टात हजर राहणे अपेक्षित होते पण ते सध्या चारा घोटाळा प्रकरणात झारखंडच्या कारागृहात असल्याने ते सुनावणीसाठी हजर राहु न शकल्याने त्यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आले आहे. आयआरसीटीची घोटाळा प्रकरणात लालू व त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधात सीबीआयने सज्जड पुरावे गोळा केले आहेत.