महिलेच्या प्रियकराचा तिच्या मुलीवर बलात्कार, मुलगी सात महिन्यांची गर्भवती
![Woman's boyfriend rapes her daughter, the girl is seven months pregnant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/crime-4-780x470.jpg)
नागपूर : एकाच घरात राहणाऱ्या आईच्या प्रियकराची वाईट नजर तिच्या १७ वर्षांच्या मुलीवर गेली. त्याने आईच्या बदनामीची धमकी देऊन मुलीशी बळजबरी करत मुलीला ७ महिन्यांची गर्भवती केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र पाथक (५२) हा मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो बांधकाम मिस्त्री असून कामाच्या शोधात नागपुरात आला. तो बुटीबोरीत राहायला लागला. त्याच्या सोबत ३६ वर्षीय मजूर महिला काम करीत होती. महिलेच्या पतीने तिला गेल्या १६ वर्षांपूर्वीच सोडले होते. त्यामुळे ती मुलीसह राहत होती. सुरेंद्रला दारुचे व्यसन आहे. महिलेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला आर्थिक मदत केली. अविवाहित असून एकटा राहत असल्याचे सांगून महिलेशी जवळिक साधली. महिलेलासुद्धा पती नसल्याची बाब त्याने हेरली. तो तिला सोबत कामावर न्यायला लागला. तसेच त्याने तिला सोबत राहून एकमेकांना साथ देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलाही त्याच्या जाळ्यात अडकली.