Breaking-newsआंतरराष्ट्रीय
म्यानमारमध्ये धरण फुटल्याने 85 गावे बुडाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/mynmaar-.jpg)
यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये धरण फुटल्याने 85 गावे पाण्यात बुडाली असून सुमारे 63,000 लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. मध्य म्यानमारच्या येदाशे इलाख्यातील धरण फुटल्याने हा अनर्थ ओढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येदाशी इलाख्यातील स्वार चाऊंगा धरणातील पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा वाढल्याने धरणाचे एक गेट तुटून गेले. बुधवारी गेट तुटले तेव्हा धरणातील पाण्याची पातळी 103.2 मीटर्स, म्हणजे धरंणाच्या कमाल क्षमतेपेक्षा अर्धा मीटर अधिक होती.
धरण फुटल्याने 85 गावे एक मीटर खोल पाण्यामध्ये बुडाली असून रंगून आणि मंडाले यांना जोडणाऱ्या महामार्गाचा 8 किलोमीटर्स लांबीचा भाग पाण्याखाली बुडाला आहे. रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. लोकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून रेड क्रॉसनेही मदतकार्य सुरू केले आहे.