पोलिसांसाठीच्या दंत तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद
इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटीचा पुढाकार
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी, पुणे शाखेतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त पुणे शहर पोलिसांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. विश्रामबाग पोलीस ठाणे, फरासखाना येथे झालेल्या या शिबिरात ५० पोलिसांची दंत तपासणी करण्यात आली आणि त्यांना मौखिक आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी, पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. भूषण बांगर, सचिव डॉ. प्रियम आदित्य, खजिनदार डॉ.विजय मब्रुकर हे उपस्थित होते .पोलिसांना रोजच्या धावपळीत मौखिक आरोग्य न सांभाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल या दंत तपासणी शिबिरात माहिती देण्यात आली .’पोलीस ही समाजाची संरक्षक फळी आहे,आणि डॉक्टर्स देखील समाजाचे संरक्षण करणारी फळी आहे. पोलिसांची फळी सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टरांनी घेतलेला हा पुढाकार आहे’,असे डॉ.विजय मब्रुकर यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध उपक्रम सुरू असून हे दंत तपासणी शिबिर त्याचा एक भाग होता ,असे डॉ विजय मब्रूकर यांनी सांगितले. गणेशोत्सवात देखील पुण्यात तीन ठिकाणी गणेश भक्तांची मोफत दंत तपासणी करण्यात आली होती.या सर्व शिबिरातून जनजागृती मोहिमेतून ‘गॉड क्रिएटस, वी रिक्रिएट’ असा संदेश दिला जात आहे.