breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

इंद्रायणी नदी संवर्धनासाठी प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’

  • नैसर्गिक नाल्याद्वारे नदी पात्राला जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया
  • कुदळवाडी येथे महापालिका प्रशासनाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

पिंपरी । प्रतिनिधी
इंद्रायणी नदी संवर्धनाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, नाल्यांद्वारे थेट नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर आता प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी कुदळवाडी येथील नैसर्गिक नाल्याजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच कार्यान्वयीत होणार आहे.
चिखली, तळवडे आदी भागांमध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या भागातील औद्योगिक कंपन्यांमधून निर्माण होणारे रसायणमिश्रीत सांडपाणी कुदळवाडीतून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यात सोडले जाते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारीही करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांकडून महापालिका कर वसुली करते. त्याठिकाणी पायाभूत सुविधा देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे
दरम्यान, राष्टीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाने नैसर्गिक नाल्यांद्वारे नदी पात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर काय उपाययोजना करणार? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर महापालिका प्रशासनाकडून ज्या नाल्यांमधून सांडपाणी नदी पात्रात जाते. त्याठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येतील, असे कळवले होते. तसेच, प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही सांडपाणी थेटपणे नदी पात्रात न सोडता प्रक्रिया करावी, असे सूचवले आहे.
**
प्रकल्पासाठी अतिक्रमण हटवले…
राष्ट्रीय हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या निर्दशानुसार, पिंपरी-चिंचवड माहापालिकेच्या पर्यावरण विभागाने कुदळवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. हा प्रकल्प नैसर्गिक नाल्याजवळ उभारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी सामोपचाराने अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेवर प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, अनधिकृत बांधकामांमुळे नैसर्गिक नाला बुजवला जात होता. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नाल्याचा मूळ प्रवाह कायम राहीला असून, सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पही उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.

प्रकल्पासाठी अतिक्रमण हटवले…प्रकल्पासाठी अतिक्रमण हटवले…

  • संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता.

नैसर्गिक नाल्याच्या मूळ प्रवाहाला अडथळा न करता अतिक्रमण हटवून उपलब्ध झालेल्या जागेत प्रकल्पाचे काम सुरू आहे. कुदळवाडी येथील नाल्यातून इंद्रायणी नदीपात्रात मिसळणारे रसायणमिश्रीत पाणी पुढे तीर्थक्षेत्र आळंदीपर्यंत जाते. नदीचे संवर्धन व्हावे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करता यावी. याकरिता राष्ट्रीय हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण महमंडळाच्या निर्दशानुसार प्रशासन काम करीत आहे. निर्धारित वेळत प्रकल्प कार्यान्वयीत करण्याचा आमचा संकल्प आहे.

  • संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता.

  • संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button