TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी

‘लम्पी’चा वर्धा जिल्ह्यातही शिरकाव; गोवंशीय जनावरांमध्ये आढळली लक्षणे

राज्यातील प्रमुख शहरांपाठोपाठ आता वर्धा जिल्ह्यातही गोवंशीय पशुधनात आढळणारा ‘लम्पी स्कीन’ या आजाराने शिरकाव केला आहे. आर्वी व आष्टी तालुक्यातील गोवंशात तीन जनावरांना या आजाराची लागण झाल्याने पशुसंवर्धन विभाग आता ‘अलर्ट मोड’वर आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी साथरोग प्रादुर्भाव अंतर्गत संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे.

बारा गावे सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा, आर्वी शहर व सावलापूर तसेच आष्टी तालुक्यातील वडाळा हे परिसर ‘लम्पी’बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. येथील सात गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ चर्मरोगसदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्याचे नमुने नागपूर व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रादुर्भावग्रस्त हिवरा गावापासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील हररासी, पाचोड, बेलहारा तसेच हिवरा, जामखुट तसेच खडकी, शिरपूर, पिंपळा, वाढोना, धानोडी व अन्य बारा गावे सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या गावातील जनावरांना इतर निरोगी परिसरात वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button