अजित दादांनीनी सत्ताधाऱ्यांना खडसावले ः वेदांताप्रकरणी संभ्रम निर्माण करू नका, पाहिजे तर चौकशी करा…
Ajit Dadan reprimanded the rulers: Do not create confusion in the Vedanta case, if necessary, investigate...
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Ajit-Pawar.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
काहीजण उगाच बेरोजगार तरुणांमध्ये अफवा पसरवत आहेत. आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला अशा बतावणी मारल्या जात आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं अजित पवार म्हणाले.
मुंबई – वेदांता प्रकल्पाबाबत खूप चर्चा झाली, शेवटपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा याकरता प्रयत्न सुरू होते. पण सध्या कारण नसताना संभ्रामवस्था निर्माण केली जातेय. पैशांची मागणी केल्याचा आरोप केला जातोय. ज्यांनी असा आरोप केला आहे, त्यांच्या हातात सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, वेदांता प्रकल्प आणि ग्रामपंचायत निवडणुकाबाबत पत्रकारांना माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, १५ जून २०२२ रोजी राज्यात मनोज श्रीवास्तव यांच्यासोबत उच्चाधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्रीही होते. त्यावेळी वेदांता प्रकल्पाबाबत माहिती घेण्यात आली. वेदांता लिमिटेड प्रकल्प फेब घटकांतर्गत महाराष्ट्रात येण्याकरता ऑर्डर निघाली होती. आमचं सरकार जूनमध्ये गेलं. म्हणजे शेवटपर्यंत आम्ही प्रकल्प राज्यात आणण्याचा प्रयत्न करत होते, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं. काहीजण उगाच बेरोजगार तरुणांमध्ये अफवा पसरवत आहेत. आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला अशा बतावणी मारल्या जात आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं अजित पवार म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे रंगीत तालिम
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. सरपंचाने लिहून दिलं की अमक्या पक्षाचा समर्थक आहे तर ती गोष्ट वेगळी. माध्यमांनी जे आकडे दाखवले ते पाहिलं तरी त्यात मविआला जास्त जागा मिळाल्या आहेत, हेच स्पष्ट होतंय. म्हणजे लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे कळतंय. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे रंगीत तालिम असते, असंही अजित पवार म्हणाले.