पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची तब्बल सहा कोटींची फसवणूक; माजी नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्हा
![Scam of Rs 6 Crores of Builder in Pune; A case against three including a former councillor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/crime-compressed.jpg)
पुणे | बांधकाम करारानुसार पाच कोटी ३५ लाख आणि हात उसने घेतलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता प्रकल्पातील सदनिकेची परस्पर विक्री करून गुंडांमार्फत गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक फारूख यासीन सय्यद इनामदार (रा. महम्मदवाडी), अफान इनामदार आणि अमितकुमार सिन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल (वय ३८, रा. ढोले पाटील रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोयल बांधकाम व्यावसायिक आहेत. फारुख इनामदार यांच्या मालकीची जमीन विकसनासाठी गोयल यांना देण्यात आली होती. आरोपींनी गोयल यांना विकास हस्तांतरण हक्क ( टीडीआर) विकत घेऊन न दिल्यामुळे बांधकामास विलंब होऊन गोयल यांचे आर्थिक नुकसान झाले. गोयल यांनी पुणे महापालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर आरोपी महापालिकेत गेले आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली. गोयल यांच्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांची फसवणूक केली.