Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा
प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या
![Killing of girlfriend due to love affair](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Killing-of-girlfriend-due-to-love-affair.png)
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने महिलेचा गळा चिरून हत्या केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. शहरातील हडको कॉर्नर डिमार्टजवळ एका खोलीत महिलेची हत्या करून मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. अंकिता श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव असून सौरभ लाखे असं आरोपीचं नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण असून सौरभ हा विवाहित होता. मृत अंकिताने सौरभकडे लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर सौरभ याने महिलेचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाला असताना देवगाव पोलिसांनी त्याला पकडले.हत्या केल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली
सौरभ हा पत्रकार असून स्थानिक दैनिकासाठी काम करतो. त्याने महिलेची हत्या केल्यानंतर मी हत्या केली असल्याची माहिती पत्रकार आमि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यानंतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहितीसुद्धा ग्रुपवर टाकली.