राहण्यायोग्य शहराच्या यादीत पिंपरी चिंचवड पिछाडीवर ; आयुक्त हर्डीकर करताहेत अभ्यास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Shravan.jpg)
पिंपरी – राहण्यायोग्य शहराच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहर ६९ व्या स्थानापर्यंत पिछाडीवर का गेले ? याबाबत मुख्यमंत्र्याच्या नागपूरहून आलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर याविषयी सखोल अभ्यास करत आहेत. तसेच शहर पिछाडीवर जाण्याची कारणे शोधणार आहेत.
केंद्र सरकारने देशातील राहण्यायोग्य शहराची यादी तयार केली. या यादीत पुणे शहर प्रथम स्थानावर होते. तर, पिंपरी-चिंचवड थेट ६९ व्या स्थानावर गेले. शहर पिछाडीवर गेल्याने महापालिका प्रशासन व सत्ताधा-यांची नाचक्की झाली आहे. त्याबाबत आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता त्यांनी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, हे सर्वेक्षणाची पध्दती, तसेच कोणत्या घटकामध्ये पिंपरी-चिंचवडला कमी गुण मिळाले ? याचा अभ्यास पालिका केला जाणार आहे. या व्यतिरिक्त शहरात स्मार्ट सिटी, सिटी टार्न्सफार्मेशन ऑफीसअंतर्गंत विविध कामे नियोजनात आहेत. बायसिकल शेयरिंग, दळणवळणाच्या सुविधा, पार्कीग सोय, प्रदूषण नियंत्रणासाठी काम सुरू आहे. आवास योजनांची कामे सुरू आहेत. बांधकामे नियमित करण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भौतिक सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्यातून शहरात आगामी काळात खूप सुधारणा होणार आहेत. त्याचा फायदा शहराला होईल. तसेच,