#HBD : सैफ अली खानचा आज ४८ वा वाढदिवस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/safe-ali-.jpg)
- वाढदिवसाचे फोटो व्हायरल, सारा अली खान आणि इब्राहिम अली खानही दिसले पार्टीत
बाॅलीवूड अभिनेता आणि नवाब सैफ अली खान हा आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफने वाढदिवसानिमित्त बुधवारी रात्री त्याने घरी मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये त्याचे कुंटुब आणि जवळचे मित्र सामिल झाले होते. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पार्टीमध्ये सैफ अली खान आपल्या कुंटुबियासोबत चांगलाट मौज-मस्ती करताना दिसत आहे. सैफच्या पार्टीतील व्हायरल फोटोमध्ये त्याचा मुलगा तैमूर अली खान कुठेही दिसत नाही आहे, मात्र पहिल्या पत्नीची मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान पार्टीत दिसून येत आहे.
सैफ अली खानच्या या खाजगी पार्टीत करीना कपूर, करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू दिसत आहेत. 15 आॅगस्टच्या रात्री इंस्टाग्रामवर सारा अली खान हिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकचा फोटो पोस्ट केला आहे. या केकवर वुई लव यू सैफू असे लिहले आहे.
सैफ अली खान हा प्रसिध्द बाॅलीवूड अभिनेता आहे. साल 1960-70 चा काळ गाजविणारी प्रसिध्द अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आणि क्रिकेटपटू मंसूर अली खान पत्तोडी यांचा सैफ अली खान हा मुलगा आहे. अमृता सिंग हिच्याशी 2004 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर सैफ याने 2012 मध्ये करीना कपूर हिच्याशी विवाह केला होता. सैफ अली खान हा वेब सीरीज सेक्रेड गेम्स यामध्ये दिसून आला होता. त्यानंतर तो सध्या निखिल अाडवाणी याच्या बाजार या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त अाहे.