आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा; महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची एन्ट्री
![आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा; महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममतादीदींची एन्ट्री](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/आसाममधील-बंडखोरांना-पश्चिम-बंगालला-पाठवा-महाराष्ट्राच्या-सत्तानाट्यात-ममतादीदींची-एन्ट्री.jpg)
कोलकाताः शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे (MVA Crisis) नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर, शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम असून आघाडी सरकारला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय सत्तानाट्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी उडी घेतली आहे. (Mamata Banerjee reacts to Maharashtra political crisis)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यासह देशातील राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी यांनीही भाजपवर निशाणा साधत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तसंच, बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यायला हवे. आम्ही योग्य तो पाहुणचार करु, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्हाला उद्धव ठाकरे आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजपा सत्तेत आहे. तुम्ही पैसा, ताकद आणि माफियाची शक्ती वापरत आहेत. पण एक दिवस तुम्हालाही जावं लागेल. कोणीतरी तुमचा पक्षही फोडेल. हे चुकीचं आहे. मी या गोष्टीचा पाठिंबा देत नाही. आसामऐवी त्या बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करु. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारनांही धक्का देतील. आम्हाला लोकांसाठी संविधानासाठी न्याय हवा आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.