breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तुम्ही आलात आता बाकीच्या आमदारांचं काय? आमदार नितीन देशमुखांनी उत्तर देत सांगितला सुटकेचा थरार

  • मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक

नागपूर : महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती होती. नितीन देशमुख यांचा बी.पी वाढल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, नितीन देशमुख आज नागपूर विमानतळावर परतले आहेत. नागपूरमध्ये परतल्यानंतर त्यांनी मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचं म्हटलेलं आहे. तर, सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव होता, मला कसली तरी इंजेक्शन टोचण्यात आली, असं नितीन देशमुख म्हणाले. नितीन देशमुख यांना पत्रकारांनी तुम्ही आलात बाकीच्यांचं काय असं विचारलं असता त्यांनी धीरे धीरे सर्व ठीक होईल, असं त्यांनी म्हटलं.

  • नितीन देशमुख काय म्हणाले?

माझी तब्येत बरी आहे. मी तुमच्यासमोर चांगल्या स्थितीत उभा आहे. काल तिथल्या लोकांनी रुग्णालायत नेलं. तुमच्यावर कारवाई करायची होती. माझा बी.पी. वाढला नव्हता. रुग्णालयात नेल्यावर माझ्या दंडामध्ये चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन टोचण्यात आले. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आमचे मंत्री होते पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी घरी जात आहे. माझ्या मागे २०० पोलीस होते, मी घरी येत होतो. पोलीस आले मला रुग्णालयात नेण्यात आलं, अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असल्याचं नितीन देशमुख म्हणाले. रुग्णालयात नेल्यानंतर २० ते २५ लोकांनी माझ्या दंडात जबरदस्तीनं इजेक्शन टोचलं, असं नितीन देशमुख म्हणाले.

आमचे मंत्री होते त्यामुळं मी गेले होतो. पण, मी उद्धव ठाकरेंचा सैनिक आहे. मला अटॅक आला नव्हता, रुग्णालयात माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्यात आली, असं नितीन देशमुख म्हणाले. रात्री मी हॉटेलमधून बाहेर निघालो. माझ्या मागावर १०० ते २०० पोलीस होते. पोलिसांनी मला पकडलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं. माझा तिथं घात करण्याचा डाव होता, असं नितीन देशमुख म्हणाले. उस्मानाबादमधील कैलास पाटील आणि नितीन देशमुख माघारी आले आहेत. संजय राऊत यांनी या संदर्भात कालचं आरोप केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button