Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनसेच्या वतीने मोरया गोसावी गणपतीला अभिषेक
![राज ठाकरे यांच्यावर उत्तम आरोग्यासाठी मनसेच्या वतीने मोरया गोसावी गणपतीला अभिषेक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/राज-ठाकरे-यांच्यावर-उत्तम-आरोग्यासाठी-मनसेच्या-वतीने-मोरया-गोसावी-गणपतीला.jpg)
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदूजननायक राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चिंचवड येथील जागृत देवस्थान श्री मोरया गोसावी गणपती देवस्थान (मंदीर देऊळ वाडा) येथे अभिषेक करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज सकाळी ७ वाजता हा अभिषेक करण्यात आला.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, राजु सावळे, बाळा दानवले, राजु भालेराव, विशाल मानकरी, मयुर चिंचवडे, सुशांत साळवी, शैलेश पाटील, नितिन चव्हाण, सुमित कलापुरे, बालाजी पांचाळ, विशाल उकिरडे, जितेश वाल्हेकर, निलेश नेटके, नारायण पठारे, के.के. कांबळे व योगीता कांबळे हे सर्व मोरया गोसावी मंदीरामध्ये अभिषेक करण्यासाठी उपस्थित होते.