शिंदे तातडीने दिल्लीला रवाना;? राष्ट्रपती पदासाठी सुशील कुमार शिंदेंना उमेदवारी
![Shinde immediately leaves for Delhi ;? Sushil Kumar Shinde's candidature for the post of President](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Sushil-Kumar-Shinde.jpg)
सोलापूरः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे तर २१ जुलै रोजी देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. आता याच निवडणुकांच्या दृष्टीने देशात हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शरद पवारांवी नकार दिल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यामुळे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत रवाना झाले आहेत.
२००२मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरुद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते, तरीही शिंदे यांना उमेदवारी दिली होती. आता राष्ट्रपतिपदासाठी भाजप देईल तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे, तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीचा विषय या बैठकीत नसावा, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.