महावितरणच्या 2285 वीज कंत्राटी कामगारांना हायकोर्टाचा दिलासा
- “जैसे थे’ ठेवण्याचे आदेश
- खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे ठाणे औद्योगिक कोर्टाला निर्देश
मुंबई – महावितरण कंपनीतील सुमारे 2285 वीज कंत्राटी कामागारांना तूर्त कामावरून काढू नका. “जैसे थे’ स्थिती ठेवा, असा आदेश उच्च न्यायालयाने महावितारण दिला. या कामगारांना कायम करण्यासंबंधी औद्योगिक न्यायालयात सुरू असलेला खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश न्यायमूर्ती एम. सी. गुप्ते यांनी दिले.
महावितरण कंपनीत 2012मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी 7000 जागांची जाहिरात काढण्यात आली. त्यावेळी महावितरण कंपनीमध्ये लाईन हेल्पर या पदावर सुमारे 10 हजार कंत्राटी कामगार कार्यरत होते. नवीन भरती झाल्यानंतर कंपनीने जालना व पुण्यातील कामगारांना महावितरणे कामावरून कमी केले होते, तर सोलापूर येथील कामगारांच्या बदल्या केल्या.
कंपनीच्या या निर्णया विरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने औद्योगिक कोर्टात आव्हान दिले. औद्योगिक न्यायालयाने कामगार संघटेनेची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. मात्र त्यांना सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात कोणतेही निर्देश दिले नसल्याने कामगार संघटनेने 2013 मध्ये हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कंत्राटी कामगारांना कामावरून काढून नका “जैसे थे’ स्थिती ठेवा, असा आदेश देताना औद्यागिक न्यायालयाला सहा महिन्यात खटला निकाली काढण्याचे आदेश देताना तोपर्यंत कामगारांचे वेतन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.