पिंपरी / चिंचवड
माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/domestic-violence.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 27 फेब्रुवारी 2020 ते 24 मे 2022 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.
पती शाहरुख फारुख मोमीन (वय 27), परवीन फारुख मोमीन (वय 51), फारुख बाबू मोमीन (वय 58), नणंद झीनत इम्रान काझी (वय 29, सर्व रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीला तिच्या माहेरहून पाच लाख रुपये घेणून येण्याची जबरदस्ती केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. पती शाहरुख याने फिर्यादी यांच्या आई आणि बहिणीचे ऐकून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.