पिंपरी / चिंचवड
महिलेचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी
महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो एका तरुणाने सोशल मिडीयावर व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना 12 मे ते 23 मे या कालावधीत काळेवाडी येथे घडली.
पिडीत महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज उर्फ मानिकांत उर्फ मन्या सुरेश बंडगर (वय 27, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 12 ते 23 मे या कालावधीत फिर्यादी यांचे खाजगी फोटो सोशल मीडियाद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवले. फोटो व्हायरल करून फिर्यादी यांची बदनामी आणि विनयभंग केला. आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.





