मंदिरांच्या जीर्णोद्धाराला औरंगजेबाच्या कबरीचा सांभाळ करणाऱ्या पुरातत्त्वचा खोडा : उद्धव ठाकरे
![Archaeological excavation of Aurangzeb's tomb for restoration of temples: Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/मंदिरांच्या-जीर्णोद्धाराला-औरंगजेबाच्या-कबरीचा-सांभाळ-करणाऱ्या-पुरातत्त्वचा-खोडा-उद्धव.jpg)
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथील शिवसंपर्क अभियानाच्यासभेत भाजपवर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांच्यावर मुन्नाभाई म्हणत अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्र्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मध्ये एका शिवसैनिकानं विचारलं, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? मी विचारलं कारे, तर तो म्हणाला की त्यात मुन्नाभाईला गांधीची दिसतात, त्यानंतर तो गांधीगिरी करतात. तशी एक केस आपल्याकडे आहे, त्याला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. कधी शाल घेऊन फिरतात, कधी मराठीचा मुद्दा घेतात आणि कधी हिंदुत्च्वाचा मुद्दा घेतात. लगे रहो मुन्नाभाई मधला तो मुन्नाभाई लोकांची कामं करायचा, असं म्हटलं. तर, शिवसैनिक म्हणला तसं नाही, लगे रहो मुन्नाभाईला शेवट कळतं की आपल्या मेदूत केमिकल लोचा झाला होता. सध्या मुन्नाभाई फिरत आहेत, फिरु द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाईचं उदाहरण देत नाव न घेता टीका केली.
बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जावेद मियादाँद आला होता. बाळासाहेबांनी त्याला तु स्टेडियमवर माकडचाळे करतो, असा सवाल केला. क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात, असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील जनतेला मी धन्यवाद देतो. करोनाच्या संकटाच्या काळात तुम्ही सहकार्य करत आहात त्याबद्दल मी आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.