breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’; शिवसेनेचे मुंबईत पोस्टर
मुंबई – भाजपसोबत संबंध ताणले गेले असताना शिवसेनेने पुन्हा एकदा हिंदुत्व कार्ड बाहेर काढले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसी येथे जाण्याची घोषणा केली आहे. या संदर्भाचे पोस्टर मुंबईच्या अनेक भागात शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.
याबद्दल माहिती सांगताना शिवसेना नेता संजय राऊत यांनी म्हंटले कि, उद्धव ठाकरे आधी अयोध्येला जातील व तेथे रामाचे दर्शने घेऊन ते एका रॅलीला संबोधित करतील. त्यानंतर ते वाराणसीला जाऊन काशी विश्वनाथचे दर्शन घेतील. तसेच गंगा आरतीमध्येही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.