पिंपरी / चिंचवड

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारची चोरी

पिंपरी | प्रतिनिधी

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार बुधवारी दि. 27 रात्री साडे अकरा ते गुरुवारी दि. 28 सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास स्पाईनरोड, कृष्णानगर,  चिंचवड  येथे घडला.

अरुण दत्तात्रय पोवार वय 61, रा. स्पाईनरोड, कृष्णानगर, चिंचवड यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक लाख 75 हजार रुपये किमतीची शेवरलेट तवेरा ही गाडी बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास स्पाईनरोड कृष्णानगर येथे सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची गाडी चोरून नेली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button