ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून दोन गटात दगडफेक; वाहनांच्या काचा फुटल्या, एक तरुण जखमी

जळगाव|जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून वाद उद्भवून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना शनिवारी १६ एप्रिल रोजी रात्री साडे दहा ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून एक तरुण जखमी झाला आहे. हमद अखिल पिंजारी (वय-१८) असे जखमीचे नाव असून याप्रकरणी दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास व्हॉटसअपच्या स्टेटसवरून दोन गटात वाद होवून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एम.एच.19 सी.वाय. 2799 आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची (एम.एच. 03 ए.आर. 1508) फोरव्हिलर सँट्रो कारच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी (वय-१८) हा तरुण रस्त्याने मलीकनगरला जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे.

वादापूर्वी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्‍या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली. यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. मात्र त्यानंतर पुन्हा अफवा पसरुन मलीकनगर व नसीमन कॉलनीत काही समाज कंटकांनी दगडफेक केली. शिरसोली गावात हनुमान जयंतीनिमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button