पिंपरी / चिंचवड
वाहन विक्रीच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी
तीन कंटेनर विकण्याच्या बहाण्याने करारनामा करून सात लाख 41 हजार रुपये घेतले. त्यानंतर कंटेनर न देता फसवणूक केली. हा प्रकार 23 फेब्रुवारी ते 9 एप्रिल या कालावधीत कुरुळी येथे घडला.
फ्लायव्हील लॉजिस्टिक सोल्युशन प्रा ली या कंपनीचे एच आर रमेश श्रीवास्तव, कामगार पप्पूकुमार शर्मा आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज रमेश कुटे (वय 31, रा. आकुर्डी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांचे तीन कंटेनर फिर्यादी यांना 12 लाख 21 हजार रुपयांना विकण्याचे ठरवले. त्याप्रमाणे नोंदणीकृत करारनामा केला. तसेच फिर्यादी यांच्याकडून सात लाख 41 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कंटेनर न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.