पिंपरी / चिंचवड

मॅगझीन चौकातून पाच तलवारी जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

दिघी येथील मॅगझीन चौकातून दिघी पोलिसांनी पाच तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी चार वाजता करण्यात आली.

मनीदर (रा. अमृतसर), आकाश पाटील (रा. चिखली, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शेख शिंदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅगझीन चौक, दिघी येथे दोघांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपींकडे पाच तलवारी आढळून आल्या. तलवारी वापरण्याच्या परवान्याबाबत चौकशी केली असता आरोपींनी बेकायदेशीरपणे तलवारी बाळगल्या असल्याचे समोर आले. 15 हजारांच्या पाच तलवारी जप्त केल्या आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button