बनावट जीन्स ब्रांडेड कंपनीच्या नावाने विकणा-या दुकानदाराला अटक

पिंपरी l प्रतिनिधी
बनावट जीन्स एका ब्रांडेड कंपनीच्या नावाने विकल्या. याप्रकरणी पिंपरी मार्केटमधील एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी साई चौकाजवळ, पिंपरी येथे जीन्स पॉइंट बाय लेजेड्स चॉईस या दुकानात करण्यात आली.
इस्माईल इस्तेखार खान (वय 26, रा. मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या सुपरड्राय कंपनीच्या जीन्स पॅंट विकल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी दुकानात भेट देऊन पाहणी केली असता आरोपीच्या दुकानात 25 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 512 पॅंट आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.




