किसान कृषी प्रदर्शनात नागरिकांच्या मोबाईलवर डल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
मोशी येथे भरलेल्या किसान कृषी प्रदर्शनात प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर देवराम राणे (वय 46, रा. महाजन गल्ली, ता. यावल, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोशी येथील किसान कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी आले होते. रविवारी दुपारी सव्वा एक ते पावणे दोन वाजताच्या कालवधीत किसान कृषी प्रदर्शनात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या खिशातील 80 हजारांचा महागडा मोबाईल फोन चोरून नेला. तसेच किसान कृषी प्रदर्शनात आणखी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या लोकांचे मोबाईल फोन चोरीला गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.