ताज्या घडामोडीपुणे

मोदींचा फोटो लावून शिवसेनेने निवडणूक जिंकली, देवेंद्र फडणवीस म्हणाले;

Share On

पुणे | शिवसेनेने मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकली, असा घणाघात करून २०१९ मध्येच शिवसेनेची लाचारी दिसली असं राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. एमआयएमने युतीबाबतचा प्रस्ताव ठेवल्यापासून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच, फडणवीसांनी आता शिवसेनेला बोचरी टीका केल्याने शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकल्या. आणि सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये. आता भगव्यासाठी फक्त भाजप आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी एमआयएमसोबत जावं किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत, मात्र 370 कलम हटवलं तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते. त्यांना इतिहास माहिती नाहीये, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button