ताज्या घडामोडीमुंबई
विषय संपला! महाविकास आघाडीत एमआयएमचा प्रस्ताव शरद पवारांनी धुडकावला;

मुंबई | एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली. मात्र, आता खुद्द शरद पवार यांनीच हा प्रस्ताव धुडकावला आहे. आमच्या दृष्टीने हा विषय संपला असून राज्याच्या युनिटला कोणत्या पक्षासोबत आघाडी करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एमआयएमनं महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपनं टीका करण्यास सुरुवात केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आज दुपारी एमआयएमला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं होतं.





