पिंपरी / चिंचवड
सदनिका विकण्याच्या बहाण्याने तिघांची 18 लाख 50 हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी
सदनिका विकत देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन सदनिका न देता तिघांची 18 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2015 ते 15 मार्च 2022 या कालावधीत स्पाईन रोड, पीसीएनटीडीए एमआयडीसी भोसरी येथे घडला.
जगदीश रामू (रा. दिघी. मूळ रा. बेंगलोर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश बापू लोंढे (वय 40, रा. येरवडा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तसेच गजानन घाटगे, विना नागपठाणी यांना वडमुखवाडी येथे मिराकाल या साईटवरील सदनिका विकत देतो असे सांगितले. त्यासाठी तिघांकडून आरोपीने 18 लाख 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन तिघांना सदनिका न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.