ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने दोन अंगठ्या पळवल्या
पिंपरी l प्रतिनिधी
ज्वेलर्सच्या दुकानातून अनोळखी व्यक्तींनी दोन अंगठ्या पळवल्या. ग्राहक बनून आलेल्या व्यक्तीने अंगठी पाहण्यासाठी घेतली आणि बोटात घालून बघतो असे सांगून दोन अंगठ्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी सहा ते साडेसह वाजताच्या कालावधीत मारुंजी येथील दीपलक्ष्मी ज्वेलर्स येथे घडली.
महेश देविदास मैडकर (वय 47, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानात त्यांच्या पत्नी असताना एक अनोळखी व्यक्ती ग्राहक बनून आला. सोन्याची अंगठी बघण्याच्या बहाण्याने घेतली. दोन्ही अंगठ्या बोटात घालून पाहण्याच्या बहाण्याने घेतल्या आणि चलाखीने नजर चुकवून त्या चोरुन नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.