‘नाशिक फाटा ते चाकण’ मेट्रोचा विस्तारित डीपीआर तयार करा – आमदार महेश लांडगे यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/download-2-1.jpg)
पिंपरी – नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तेथील नागरिक, विद्यार्थ्यांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रोचा डीपीआर नव्याने सामाविष्ट करावा, तसेच ते लवकर पुर्ण करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
नागपूरातील पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे आमदार महेश लांडगे यांनी नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावरील मेट्रोच्या डीपीआरकडे सरकारचे लक्ष वेधले. आमदार लांडगे म्हणाले, पुणे महामेट्रोने स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रो मार्गाचा एकूण 24 किलोमीटर लांबीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पंरतु, हा डीपीआर अद्यापही पुर्ण झाला नाही. हा डीपीआर लवकर पुर्ण करण्यासाठी मी वारंवार पाठपुरावा करत आहे. परंतु, त्याला विलंब होत आहे. नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा डीपीआर त्वरित बनविण्यात यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.