शहरात अनधिकृत बांधकामासह विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई
पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिंचवड मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. तसेच अ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात सुमारे 24 फ्लेक्स आणि 40 किआॅक्स काढण्यात आले आहेत.
महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 चिंचवड, येथे अनधिकृत बांधकामे चालू होती. अनधिकृत बांधकाम विभागाने मंगळवारी या बांधकामांवर धडक कारवाई केवी. या कारवाईमध्ये चिंचवड येथील एक वीटबांधकाम, एक पत्राशेड व एक आरसीसी असे एकूण तीन बांधकामावर ( क्षेत्रफळ अंदाजे 3122.64 चौरस फुट)कारवाई करण्यात आली. तसेच अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील विनापरवाना फ्लेक्स, किआॅक्स काढण्यात आले. यामध्ये शाहूनगर, संभाजी नगर 14, नाना नानी पार्क, टिळक चाैक 6, अमृता नंदमयी मठ चाैक 3 तर किआॅक्स 40 काढण्यात आले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशव फुटाणे, कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. महापालिका पोलीस व चिंचवड पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.