पिंपरी / चिंचवड
पान टपरीमध्ये चोरी करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पान टपरी फोडून चोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे बुधवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली.
मारूफ रहीस हासमी (वय 25, रा. हुळावळे-बेंद्रे वस्ती, हिंजवडी) यांनी बुधवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलाने फिर्यादी हासमी यांची सलमान पान शॉप कुलूप तोडून आतील भाजकी मिश्रीचा पुडा व रोख रक्कम असा एकूण 590 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.