पिंपरी / चिंचवड
शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी | प्रतिनिधी
कोयता बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता रामनगर, चिंचवाफ येथे करण्यात आली.
वैभव सुरेश माने (वय 24, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश कर्पे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर चिंचवड येथे आरोपी वैभव माने हा कोयता हवेत फिरवून ‘मारुन टाकीन, कापून टाकीन’ असे मोठमोठ्याने ओरडत दहशत निर्माण करत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 रुपये किमतीचा कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस नाईक जावेद मुजावर तपास करीत आहेत.