पिंपरी / चिंचवड
रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निगडित रमाईच्या लेकरांचा सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220207-WA0000.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने निगडी भक्ती शक्ती येथे ‘रमाईच्या लेकरांचा सत्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कामगार नेते बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा रेखा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी अश्विनी सचिन चिखले – मराठे, नगरसेवक अंकुश कानडी, कामगार नेते भाऊसाहेब अडागळे, अॅड सचिन सोनवणे, काशिनाथ हडपद व इतर महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी कामगार पंचायत चे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.