नारळाच्या झाडावरून पडून एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/murder-2.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
नारळाच्या झाडावरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली. याप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
अरुण राजाराम शिंदे (वय 40, रा. गौळबाजार, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण यांच्या पत्नी मनीषा अरुण शिंदे (वय 35) यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उर्मिला मणियार (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अरुण शिंदे यांना कोणतीही सुरक्षेची साधने न पुरवता मणियार यांनी त्यांना न जमणारे नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडण्याचे काम सांगितले. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली नाही. त्यावेळी अरुण शिंदे हे नारळाच्या झाडावरून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.