Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई | प्रतिनिधी
‘कागरः लाईफ ऑन द एज’ चित्रपटात काम केलेले अभिनेते अमिताभ दयाळ यांचे आज पहाटे ४.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. १३ दिवसांपासून आजारी असलेल्या अमिताभ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
‘रंगदारी’ आणि ‘धूम’, अशा चित्रपटांमध्ये काम केलेले अमिताभ यांनी ओम पुरी यांच्यासोबत ‘कागरः लाईफ ऑन द एज’चित्रपटात काम केले होते. अमिताभ हे मूळचे छत्तीसगडच्या बिलासपूरचे आहेत. त्यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.