पुढे येऊन गुन्हा नोंदवण्यासाठी अपार धैर्य लागते, त्यांना निराश करून चालणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-4.jpeg)
तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांची उद्विग्नता
पिंपरी | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे 17 वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून तिच्यावर एका तरुणाने हातोड्याने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. यावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना पुढे येऊन गुन्हा नोंदवण्यासाठी अपार धैर्य लागते. त्यांना निराश करून चालणार नाही. त्यांना सुरक्षा प्रदान करून त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
जखमी 17 वर्षीय मुलीची शिवम विनोद शेळके (वय 20, रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याने छेड काढली. त्याबाबत मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग शेळके याला आला. त्या रागातून त्याने मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर हातोडीने घाव घालत तिच्यावर खुनी हल्ला केला.
याबाबत पार्थ पवार यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तळेगाव दाभाडे येथे छेडछाडीची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन युवतीवर हल्ला होणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे. या भीतीनेच तक्रार देण्यास टाळाटाळ होते. तक्रार दिल्यावर संरक्षण मिळेल, ही खात्री आता करावी लागेल. गुन्हा नोंदवण्यास महिलेने पुढे यायला अपार धैर्य लागते. त्यांना निराश करून चालणार नाही, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.
तळेगाव दाभाडे येथे छेडछाडीची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन युवतीवर हल्ला होणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे.याभीतीनेच तक्रार देण्यास टाळाटाळ होते. तक्रार दिल्यावर संरक्षण मिळेल ही खात्री आता करावी लागेल.गुन्हा नोंदवण्यास महिलेने पुढे यायला अपार धैर्य लागते.त्यांना निराश करून चालणार नाही
— Parth Pawar (@parthajitpawar) January 28, 2022
यावर चित्रा वाघ यांनी देखील ट्विट केले आहे. चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडून त्रास झाल्याने त्यावर पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी त्याची ना दखल घेतली ना कारवाई केली. आज भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला. दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असता ना. तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा.’
तळेगाव:अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडनं त्रास त्याच्या वांरवार पोलिस स्टेशनला तक्रारी दिल्या
पोलिसांनी ना दखल घेतली ना कारवाई केली
आज भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारलादखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असतां ना
तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022