पिंपरी / चिंचवड
सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
शाहूनगर येथील एका सोसायटीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 21) ते रविवार (दि. 23) या कालावधीत घडली.
प्रशांत सहादु आल्हाट (वय 27, रा. शाहुनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आल्हाट यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्याने सोसायटीच्या पार्किंग मधून फिर्यादी यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी लॉक तोडून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.