बीड देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण; उपजिल्हाधिकारी आघाव पाटील निलंबित
![Beed temple land scam case; Deputy Collector Aghav Patil suspended](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220115-WA0001.jpg)
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या शेकडो एकर जमिनी लाटल्याचा प्रकार उघडकीला आला होता. यामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके आणि प्रकाश आघाव पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालेला होता.या पार्श्वभूमीवर अखेर शासनाकडून उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने काल काढले आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील भु-सूधारचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याने अनेक जमिनी खालसा केल्याच्या तक्रारींचा पाऊस झाला होता. त्यामुळे चौकशी करण्यात येत होती. त्याच्यावर आष्टीत तीन तर बीडमध्ये एक गुन्हा देखील दाखल झाला होता. तत्पूर्वी त्याची बदली करण्यात आलेली होती. परंतु त्यांनी मध्यंतरी बीडला रूजू होण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकार्यांनी त्यांना रूजू करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.या सर्व घडामोडीनंतर अखेर प्रकाश आघाव पाटील याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने काढले असून त्याच्यावर जमीन खालसा प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.