breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या पक्षाला हॉकी स्टिक चिन्ह
चंदिगड | टीम ऑनलाइन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता देऊन विधानसभा निवडणुकीसाठी हॉकी स्टिक आणि बॉल चिन्ह दिले आहे. त्यावर त्यांचा पक्ष पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे.
पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना आपण विधानसभेत जाऊ देणार नाही, असा निर्धार अमरिंदर सिंग यांनी केला आहे. भाजपसोबत युती करून ते निवडणूक लढवत आहेत. निवडणूक चिन्हबाबत बोलताना ते म्हणाले की, आता फक्त गोल करायचा शिल्लक आहे.