राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना कोविडची बाधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-4-3.jpeg)
पुणे । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना कोविडची लागण झाली आहे. याबाबत पार्थ पवार यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कातील सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना देखील कोविडची लागण झाली आहे. त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली.
‘मागील काही दिवसांपासून मी कोविड बाधित असलेल्या लोकांच्या संपर्कात आलो आहे. काळजी म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. तसेच कोविड चाचणी देखील केली आहे’, असे पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Over the past few days, I have come in close contact of several people who have been tested #COVID19 positive. Out of abundant precaution, I have self-isolated myself and getting tested.
— Parth Pawar (@parthajitpawar) December 30, 2021
नागरिकांनी विशेषतः तरुणांनी कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी करणे टाळावे, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.