कतरिना कैफनं सलमान खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…..
कतरिना कैफनं सलमान खानला शुभेच्छा देत म्हटलं,”तुझ्यासोबत कायम…”
आज सलमान खानचा५६ वा वाढदिवस…त्याचा हा वाढदिवस विशेष लक्षात राहिला तो म्हणजे त्याला वाढदिवसाच्या दोन दिवस आधी झालेल्या सर्पदंशामुळे. एरव्ही सलमान खानचा वाढदिवस त्याच्या स्टारडममुळे नेहमीच चर्चेत असतो पण यावर्षी सर्पदंशामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाला अधिक प्रसिद्धिचं वलंय लाभलं हे मात्र तितकंच खरंय. त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर तो त्याचे कुंटुंबिय आणि मित्रपरिवारासोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेला असताना तिथे त्याला साप चावला पण तो साप विषारी नसल्यामुळे सलमान बचावला. त्यानं बरा झाल्यानंतर बर्थ डे सेलिब्रेट केला आणि माध्यमांसमोर प्रतिक्रियाही दिली.
त्याच्यासोबत बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूडमधीलही काही मंडळी उपस्थित होती. अभिनेता बॉबी देओल,सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान,सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांसोबत अनेक मंडळी खास मुंबईहून सलमानला भेटून शुभेच्छा देण्यासाठी पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. पण यांच्यासोबतच सलमानसाठी त्याच्या फेव्हरेट कतरिना कैफनेही दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत. कतरिनानं नुकतंच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलंय. ती सध्या त्याच्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. पण यातनंही वेळ काढत तिनं आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच सलमान खानला शुभेच्छा दिल्या आहेत.