आर्थिक टंचाईमुळे यंदा नोबेल शांतता पुरस्काराचा सांगितीक सोहळा नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nobel-prize-.jpg)
ओस्लो – नोबेल पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या आर्थिक टंचाईमुळे यंदा नोबेल शांतता पुरस्कार वितरण सोहोळ्याच्यावेळी नेहमीसारखा सांगितिक सोहोळा होणार नाही. येत्या 10 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. आर्थिक कारणामुळे आम्हाला हा कार्यक्रम यंदा रद्द करावा लागत आहे असे नोबेल संस्थेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सोहोळ्याच्या थेट प्रसारणासाठी फारसे प्रायोजकही पुढे आले नाहीत.
स्मार्ट फोनच्या जमान्यात आता दूरचित्रवाणीवाहिन्यांवरील कार्यक्रम किंवा प्रसारणाला मिळणारा प्रायोजकांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्याचा फटका या सोहोळ्यालाही बसला आहे असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुरस्कार आयोजन समितीने या कार्यक्रमाच्या फॉर्म्याट मध्ये काही बदल करण्याच ठरवले आहे. नॉर्वेच्या रेमा 1000 या सुपरमार्केट कंपनीने हा सोहोळा प्रायोजित करण्याचे सुरूवातीला मान्य केले होते पण त्यांनी नंतर त्यातून अंग काढून घेतल्याने हा सोहोळाच रद्द करण्यात आला आहे.