महेश लांडगेंच्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी चरणी १११ नारळाचे तोरण अर्पण
![111 coconut pylon offered at Tulja Bhavani Charani on the occasion of Mahesh Landage's birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/IMG-20211127-WA0002.jpg)
पिंपरी | भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त क्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी चरणी १११ नारळाचे तोरण अर्पण करण्यात आले. भोसरीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ. किर्ती मारूती जाधव आणि परिवाराच्या वतीने नारळाचे तोरण अर्पण करून दुग्धाभिषेक व साडी चोळीची ओटी भरून महेश लांडगेंच्या दिर्घायुष्यासाठी पूजा करण्यात आली.भोसरीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ. किर्ती मारूती जाधव यांनी आमदार महेश लांडगेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुळजाभवना चरणी प्रार्थना करण्यात आली.
याबाबत बोलताना सौ. किर्ती मारूती जाधव म्हणाल्या की, कितीही कसले हि संकट आले तरी सदैव सर्वांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे नेतृत्व, संकट मोचक दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार साहेबांना दिर्घायुष्य लाभो यासाठी संपूर्ण परिवाराकडून श्री आईतुळजाभवानी चरणी तुळजापूर येथे १११ नारळ तोरण, पहाटेचा दुग्धाभिषेक, साडी-चोळी ओटी भरण केले. तसेच उस्मानाबाद येथील सर्वांना पावन असणारी येडाई म्हणजेच श्री येडेश्वरी माता या देवीला महेशदादांना दीर्घायुष्य लाभो म्हणून साडी चोळी व ५१ नारळ तोरण अर्पण करण्यात आले.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भरगच्च कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र सौ. किर्ती मारूती जाधव यांनी अगळ्यावेगळ्या पद्धतीने महेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याचे सर्वच स्तरावून कौतुक होत आहे.