भाजी मंडई परिसरात सुरू असलेलं सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, दोन महिलांची सुटका
![Sex racket in Bhaji Mandai area destroyed, two women released](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-21T122340.719.jpg)
पुणे | बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात सुरू असलेलं सेक्स रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलं. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती शहर पोलिसांना शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई आणि गुणवडी चौक परिसरात काही महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.गणेश मार्केट जवळील एका सराफाच्या दुकानासमोर तीन महिला थांबल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे पाचशे रुपये देऊन त्याला त्या ठिकाणी पाठवले. या ग्राहकासोबत बोलणी करून पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी छापा टाकला आणि एका महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत त्या ठिकाणी असलेल्या महिलेला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.