शुभेच्छा दादांना अन् शुभचिंतन सुकन्यांचे!
पिंपरी चिंचवड | भाजप नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी भाजप शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा वर्षाखालील मुलींना सुकन्या वीमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले आणि मुलांनी लाभ मिळवून दिला.या मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेश लांडगे, देऊळ बंद चित्रपटामधील बाल अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर नागरगोजे, दीपक नागरगोजे तसेच सर्व प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आधार कार्ड काढणे आणि अपडेट करणे अशा मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
योगिताताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी आपण सुकन्या योजनेचा लाभ तीला मिळवून दिलात. आपण महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छांसाठी कार्यक्रम घेतलात. पण शुभचिंतन व्यक्त केले सुकन्यांचे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने नगरसेविका नागरगोजे यांच्यापाशी बोलताना व्यक्त केली.