ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार स्मिता गौड यांच्याकडे

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त स्मिता गौड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांना सोमवारी (दि.15) महापालिकेत रुजू करुन घेण्यात आले आहे.महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांची 1 सप्टेंबर 2021 रोजी रायगडमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली झाली. त्यांच्या बदलीमुळे शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. शिक्षण आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त स्मिता गौड यांच्याकडे 8 ऑक्टोबर 2021 रोजी महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी गौड यांना महापालिका शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी या पदावर रुजू करुन घेण्याबाबत 13 ऑक्टोबर 2021 रोजी रुजू अहवाल सादर केलेला आहे. महापालिकेमध्ये रुजू करुन घेणे आवश्यक आहे. त्यानुसार स्मिता गौड यांना महापालिकेत रुजू करून घेतले आहे. त्याबाबतचा आदेश सोमवारी काढला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button