इराणी विरोधकांच्या फ्रांसमधील रॅलीवर बॉंम्बफेकीचा कट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/iran-.jpg)
- सहा जणांना पकडले; इराणच्या दूताचाही समावेश
ब्रुसेल्स – इराणमधील राजवटीच्या विरोधात फ्रांसमध्ये एका गटाने आयोजित केलेली सभा बॉंबफेक करून उधळून लावण्याचा कट बेल्जीयम, फ्रांस आणि जर्मनी या देशांनी एकत्रितपणे उधळून लावला असून या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात इराणच्या व्हिएन्ना येथील राजदूताचाहीं समावेश आहे.
पॅरीसच्या उत्तरेकडे ही सभा नुकतीच झाली. ती सभा बॉंबफेक करून उधळून लावण्याचा कट होता. या सभेला इराणच्या सध्याच्या राजवटीच्या विरोधातील हजारो लोक जमले होते. त्यात काही अमेरिकन प्रतिनिधींचाही समावेश होता. इराणचे अध्यक्ष हसन रौहानी हे स्वीत्झर्लंडच्या दौऱ्यावर आले असतानाच हा प्रकार घडला आहे.
इराण सरकारच्या हस्तकांनीच फ्रांसमध्ये हे घातपाती कृत्य घडवून आणण्याचा कट केला होता. त्यामुळे त्यावर आता इराणच्या प्रतिक्रीयेची प्रतिक्षा केली जात आहे. तथापी अजून तरी इराण सरकारने यावर आपली प्रतिक्रीया दिलेली नाही. पकडण्यात आलेल्या सहा जणांपैकी अमिर एस आणि नसिमेह हे दोन प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगण्यात येते.
या स्फोटासाठी जमवण्यात आलेली सामग्री ब्रुसेल्स मध्ये पकडण्यात आली. स्फोटाची कामगीरी फ्रांसमध्ये राहणारे एक दाम्पत्य करणार होते. त्यांच्या सह त्यांच्या जर्मनीतील तीन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे. बेल्जियम पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात देशभरात एकूण पांच ठिकाणी छापे घातले आहेत. पण त्याचा तपशील मत्र अजून उपलब्ध झालेला नाही.