Breaking-newsराष्ट्रिय

बुरारी मृत्यू आत्महत्या नव्हे; सामूहिक हत्याच

  • मृतांच्या नातेवाईकांचा दावा 

नवी दिल्ली – उत्तर दिल्लीतील बुरारी वस्तीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचा गूढ मृत्यू होण्यामागे अंधश्रद्धेतून आत्महत्येची शक्‍यता मृतांच्या नातेवाईकांनी फेटाळली आहे. या सर्वांची हत्या झाली असल्याची शक्‍यताही नातेवाईकांनी वर्तवली आहे.

भाटिया कुटुंबातील मुलगी प्रियांकाच्या लग्नाची तयारी सर्व कुटुंबीय करत होते. प्रियांकाचा साखरपुडा महिन्याभरापूर्वीच झाला होता. या प्रकरणातील 11 मृतांमध्ये प्रियांकाचाही समावेश आहे. घरात सापडलेल्या हस्तलिखीत नोंदींच्या आधारे या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असावा असा पोलिसांचा संशय आहे. मात्र हा संशय प्रसार माध्यमांमुळेच बळवला असल्याचा दावा मृत नारायण देवी यांच्या कन्या सुजाता नागपाल यांनी केला आहे.

“मी नियमितपणे आईशी फोनवरून बोलत असे. आमच्या कुटुंबामध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होते. आमचे कुटुंबीय शिकलेले होते आणि त्यांचा कोणाचाही कोणत्याही बाबांवर विश्‍वास नव्हता. केवळ प्रसार माध्यमांनीच आत्महत्येचा तर्क केला आणि चुकीची माहिती छापायला सुरुवात केली आहे.’ असे त्या म्हणाल्या.

नारायण देवींची भाची गीता ठकराल यांनीही घराबाहेरील कोणीतरी या प्रकरणात सहभागी असल्याची शक्‍यता वर्तवली आहे. घरातील सर्वजण धार्मिक वृत्तीचे होते. कोणत्याही बाबा किंवा तांत्रिकाशी संबंधित प्रकरणांबाबत ऐकल्यावर घरातील कोणीही त्यावर विश्‍वास ठेवत नसत. कौटुंबिक व्यवसायही उत्तम चाललेला होता. कुटुंबात अंतर्गत कोणाचेही वाद नव्हते. सर्वजण आनंदी होते. मग ते आत्महत्या का करतील ? असे त्या म्हणाल्या. भाटिया कुटुंबियांचे अन्य नातलग मनोज भाटिया यांनीही आत्महत्येच्या शक्‍यतेवर शंका उपस्थित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group